दिंडोडा बैरेज प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण स्थगित

Mon 07-Oct-2024,02:54 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी = पवन ढोके ( वरोरा )                                                   दिंदोडा बॅरेज प्रकल्प ग्रस्त समिति शेतकरी शेतमजूर यांनी 2 ऑक्टोबर 2024 गांधी जयंती रोजी सुरू केलेले प्रकल्प ग्रस्त शेतकरी उपोषण आज दिनांक 4/10/2024 रोज शुक्रवारला मुख्य कार्यकारी अंभियंता श्री, पवार साहेब जल संपदा विभाग नागपूर यानी उपोषण स्थळलां भेट दिली.

यावेळी कार्यक्रमांचे प्रास्ताविक करतांना समितीचे उपाध्यक्ष श्री.अभिजीतभाऊ मांडेकर प्रकल्प स्थळ परिस्थिती तेथील नदी काठावर असलेली गाव मागील वर्षी झालेली पुर परिस्थिती लोकांचे काय हाल झाले. परिस्थितीवर प्रकाश टाकला. तुम्ही 1990 मध्ये जमीन संपादित करून 2017 ल प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू केले असता शेतकऱ्याचे या 17 वर्ष मध्ये किती नुकसान झाले त्यांना आज कोणतेच शासकीय लाभ घेत येत नाही किवा त्याला आपला विकास करण्यास बंदिस्त करून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती कमजोर झाली आहे तो लाचारीचे जीवन जगत आहेत . स्वतः ची जमीन असून आपल्या हक्कासाठी आज प्रकल्प ग्रात शेतकरी रस्त्यावर उतरला याला कारण शासन .योग्य वेळी जर निर्णय घेतला असता तर ही उपोषण करण्याची वेळ आली नसती. मागील वर्षी बैलबंडी मोर्चा 1मार्चला आंदोलन केले त्यावेळेस शासनाने एक जवळ पास 250 कोटींचे प्रस्ताव तयार केले आहेत . तो प्रस्ताव 1वर्ष होऊन परित करण्यात आला नाही. अप्पर मुख्य सचिव जलसंपदामंत्री महाराष्ट्र शासन यांच्या कडे आहे .यासाठी हे उपोषण करण्याचे कारण आहेत.

आज तीन दिवस जवळ पास 15 प्रकल्प ग्रस्त शेतकरी उपोषणाला बसले आहेत. सोबत सर्व प्रकल्पग्रस्त गावातील 300 शेतकरी महिला पुरुष यावेळी उपस्थित होते.जोपर्यंत प्रस्ताव पास होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी सर्व शेतकऱ्यांनी भूमिका घेतली आहे असे मत व्यक्त केले.

             त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक विलास भाऊ भोंगांडे यांनी आपले मत व्यक्त केले प्रकल्प परिस्थिती पुर परिस्थिती गावांतील महिला लहान मुल बाळ यांची पुर होता तेव्हा काय हाल झाले हे पूर्ण पूरग्रस्तांना माहित होते.